मर्सिडीज बेंझची जीएलएस भारतात लाँच

mercedez
मुंबई : आपली बहुप्रतिक्षीत भारदस्त कार जर्मन लक्झरी कार मेकर कंपनी मर्सिडीज बेंजने अखेर भारतात लाँच केली असून जीएलस हे मॉडेल मर्सिडीजने भारतात लाँच केले आहे आणि त्याची किंमत ८०.४० लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या कारचे उत्पादन पहिल्यांदाच भारतात होणार आहे.

‘मर्सिडीझ बेंझ जीएल’चे ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’ हे पुढचे मॉडेल आहे. ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’च्या बाह्यरुपात किरकोळ बदल करण्यात आला असून अन्य अंतर्गत भागातील बदलामुळे ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’ एक शाही सफारीचा अनुभव देईल, असा विश्वास कंपनीला आहे.

या कारचा समोरील भागाला रॅडिएटर ग्रिल आणि डीएरएलस प्रणालीचे मल्टि बीम हेडलाईट बसवण्यात आले आहेत. त्याचा पुढील आणि मागील भागाला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’ ही ५१३० एमएम इतकी लांब, १९३४एमएम रुंद आणि १८५०एमएम उंच आहे. ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’मध्ये व्हि८ बाय टर्बो इंजिन बसवण्यात आले आहे, त्याची क्षमता ४४९ बीएचपी आहे. या इंजिनाला ९ स्पीड अटोमॅटिक टान्समिशनलेस करण्यात आले आहे. ‘मर्सिडीझ बेंझ जीएलएस’ ही सात सिटर भारदस्त कार आहे. कारमध्ये आत टॅब्लेटसारखी ८ इंच स्क्रीन आहे. याशिवाय इंटरेअरमध्ये कमालीचे बदल करण्यात आले आहेत.

Leave a Comment