
नवी दिल्ली : जेनेवा मोटर प्रदर्शनात जपानची वाहन निर्मिती करणारी मित्सुबिशी या कंपनीने ४०० किमी प्रती लीटर मायलेज देणारी लाँच केली आहे.
या कारचा लूक जबरदस्त असून ही कार नवीन संकल्पना घेऊन लाँच करण्यात आली आहे. यात विविध सोयी-सुविधा आहेत. या कारला लिथिअम इयॉन सेल्स बॅटरी बसविण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक व्हेकलची मोटर पुढे आणि रिअर, दोन्ही एक्सलला ७० केडब्ल्यू (एकूण १४० केडब्ल्यू) पर्यंत ताकत मिळते. ही एक इलेक्ट्रिक कार आहे. ही एकदा फुल चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर पर्यंत धावते.
मित्सुबिशीची कार प्रती लीटर देणार ४०० किमी मायलेज !
मित्सुबिशीची एक्स कन्सेप्ट एक सेमी ऑटोमेटिक ड्रायव्हींग कार आहे. या कारमध्ये कॅमेरा आणि सेंसर्सची मदत युजर घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या आजुबाजूची माहिती मिळते. ही कार ड्रायव्हिंग लेन बदलताना कार स्वत: आपला स्पीड कमी आणि जास्त करु शकते. याशिवाय एक खास फीचर आहे. हॉटेल्स, रेस्टोरंट्समध्ये कार पार्किंगची जागा शोधण्यास मदत करते. ही कार स्वत:च पार्किंग करु शकते. यात ५ लोक बसू शकतात, अशी या कारची रचना आहे. तसेच अधिकची पेसही मिळते. ही कार कधी बाजारात दाखल होऊन हे काही सांगण्यात आलेले नाही. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या सुविधा दिल्यात.
