आगामी वर्षात १६ कोटी स्मार्टफोन विक्रीची अपेक्षा

selfie
नवी दिल्ली: स्मार्ट फोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने विक्रीमध्ये मोठी वाढ होत असून आगामी आर्थिक वर्ष सन २०१६-१७ मध्ये देशात १६ कोटी स्मार्ट फोन्सची विक्री होईल; असा अंदाज ‘अॅसोचेम’ने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये देशात ४ कोटी ४० लाख स्मार्ट फोन्सची विक्री झाली. त्यानंतर स्मार्ट फोन्समध्ये कॅमेरा आणि इंटरनेटवर आधारित अन्य सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने स्मार्टफोन्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली. या आर्थिक वर्षात ही संख्या सुमारे १० कोटी असेल; असा अंदाज आहे. त्यात आणखी वाढ होऊन पुढील आर्थिक वर्षात ती १६ कोटी होईल; असा ‘अॅसोचेम’चा अंदाज आहे.

आपली छायाचित्र अथवा व्हिडिओ काढणे आणि तो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणे हे महानगरातच नव्हे; तर निम शहरी भागातील तरुणाईचे फॅड बनले आहे. हे सगळी कामे स्मार्टफोनवर करता येत असल्याने तरुणाई त्याकडे आकृष्ट होत आहे; असे निरीक्षण ‘अॅसोचेम’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment