भारतात येणार १० लाखांची वेस्पा !

vespa
मुंबई : तुम्ही जर का बाईकचे दिवाने असाल तर आजवर तुम्ही अनेक महागड्या बाईक्स रस्त्यावर पाहिल्या असतील पण जर कमी किमतीतली एखादी स्कुटी लाख रुपयात मिळत असेल तर नक्कीच तुमचे डोळे पांढरे पडतील.

पण हे खरे आहे कारण ईटालियन ऑटोमेकर कंपनी पियाजियोने दोन खास स्कुटर भारतात लाँच करण्याचा निर्धार केला आहे. पियाजियो ९४६ ही स्कूटर ऑटोमोबाईल डिझाईनर आणि फॅशन डिझाईनरने डिझाईन केली आहे. पियाजियो या कंपनीला १३० वर्ष पूर्ण झाल्याने अरमानीने वेस्पा सोबत मिळून हि स्कूटी डिझाईन केली आहे. या स्कूटीची किंमत ही जवळपास ७ लाख रुपये आहे पण टॅक्स मिळून याची किंमत जवळपास १० लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे आता भारतीय या स्कूटीला किती प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.

Leave a Comment