वुडलँडचे सर्पदंशापासून संरक्षण देणारे बूट

woodland
फिटनेस ब्रँडची वाढती लोकप्रियता आणि व्यवसायातील अनेक संधी कॅश करण्यासाठी वुडलँड ने खास युवा वर्गावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्यासाठी अनेक आकर्षक उत्पादने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे प्रमुख हरकिरतसिंग या संदर्भात म्हणाले की आम्ही सर्पदंशापासून संरक्षण देणारे बूट तसेच पावसातही हातात न धरताही पावसापासून संरक्षण देणारी छत्री अशी वैशिष्टपूर्ण उत्पादने बाजारात आणतो आहोत.

आजकाल युवावर्गात फिटनेसचे फॅड आहे आणि अशा फिटनेसफ्रिक युवकांसाठी चष्मे, कॅपिग लाईट, ट्रेकिंग पोल, वॉटरप्रूफ बॅग्ज, अल्ट्रा व्हायोलेट किरणांना प्रतिबंध करणारे टी शर्ट आम्ही बाजारात आणले आहेत. त्या पाठोपाठ आता सुपर शूज आणि छत्र्याही आणत आहोत. त्याचबरोबर अडचणीत उपयुक्त ठरतील अशी अनेक उत्पादने आम्ही बनवत आहोत. फिटनेस बँड व घड्याळे यांचाही त्यात समावेश आहे.

Leave a Comment