स्वस्त झाला आयफोन ५एस !

iphone
मुंबई: अॅपलने काल झालेल्या इव्हेंटमध्ये मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आयफोन SE अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. हा फोन स्वस्त असेल असा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र या फोनची किंमत तब्बल ३९ हजार रुपये आहे.

दुसरीकडे या फोनच्या लाँचिंगनंतर आयफोन ५एस हा फोन स्वस्त होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण हा फोन निम्म्या किमतीवर येईल असे सांगण्यात येत होते. मात्र आयफोन ५एसची किंमत निम्म्यावर आली नसली तरी सध्या तो १८ हजार रुपयांच्या घरात आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘ईबे’ आणि अॅमेझॉनवर आयफोन ५एसच्या किमती १८ हजार रुपयांच्या आसपास आहेत.

Leave a Comment