फ्लिपकार्टवर होळीनिमित्त स्मार्टफोनवर भरघोस सूट

flipkart
मुंबई: तुमचा स्मार्टफोन घेण्याचा विचार असेल तर तुम्हाला एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर होळीनिमित्त स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात आली आहे. ही सूट सॅमसंगच्या स्मार्टफोनवर मिळणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी ON५, ON७ आणि गॅलक्सी कोर प्राइम स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळणार आहे. गॅलक्सी ON५, ON७ वर १००० रुपयाची सूट मिळणार असून गॅलक्सी कोअर प्राइमवर २००० रुपयाचे डिस्काउंट मिळणार आहे. लाँचिगच्या वेळेस गॅलक्सी ON५ ची किंमत रु. ८९९० होती तर ON७ची किंमत रु. १०९९० होती. या डिस्काउंटनतर गॅलक्सी ON५ हा रु. ७९९० तर गॅलक्सी ON७ ९७९० रुपयांना मिळणार आहे. गॅलक्सी कोअर प्राइम स्मार्टफोनही डिस्कांउट मिळणार आहे. यावर रु. २०००ची सूट देण्यात आली आहे. या ऑफरनंतर हा स्मार्टफोन रु. ५९९० उपलब्ध आहे.

Leave a Comment