‘अलिबाबा’ ‘वॉलमार्ट’ला टाकणार मागे

alibaba
बीजिंग: चीन येथील ‘ई-कॉमर्स’ कंपनी ‘अलिबाबा’ची वाटचाल जोमदारपणे सुरू असून ‘अलिबाबा’ लवकरच जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या ‘वॉलमार्ट’ला मागे टाकण्याची शक्यता आहे. ‘अलिबाबा’ची विक्री तीन लाख कोटी युआन; अर्थात ४६३ अब्ज डॉलर आहे.

‘अलिबाबा’कडून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्च रोजी विक्रीची अधिकृत आकडेवारी घोषित केली जाणार आहे. ‘वॉलमार्ट’ने ३१ जानेवारी २०१६ पर्यंत ४७८.६ अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली आहे; तर ‘अलिबाबा’ने तीन लाख कोटी युआन; अर्थात ४६३ अब्ज डॉलरची विक्री केली आहे.

Leave a Comment