चीनने बनवला कृत्रिम सूर्य

china
बीजिंग – चक्क एक कृत्रिम सूर्य चीनच्या शास्त्रज्ञांनी बनविला असून पाच कोटी डिग्रीहून अधिक उर्जा हा सूर्य उत्सर्जित करू शकतो. हा कृत्रिम सूर्य ‘हेफैई इस्टिट्यूट ऑफ फिजीकल सायन्स’ ने बनविल्याचे पीपल्स डेलीने म्हटले आहे.

‘दि एक्सपेरिमेंटल टोकमाक’ असे नाव या कृत्रिम सूर्याला देण्यात आले आहे. ‘नियंत्रित थर्मोन्युक्लिअर फ्युजन’ च्या माध्यमातून हा सूर्य अपरिमित अमर्याद शुद्ध उर्जा निर्माण करू शकतो असे चायना ऍकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग फिजीक्समधील संशोधक क्झु जिआन यांनी सांगितले. या सूर्यातील उष्णता व प्रकाश ड्युटेरियम व टिट्रियम नावाच्या दोन हायड्रोजन्समधून येते. सूर्याच्या एक हीलियम परमाणु फ्युजन प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कृत्रिम सूर्यामध्येही हीच प्रक्रिया होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment