अॅपलचा बहुप्रतीक्षित ‘आयफोन SE’ लॉन्च

apple
सिलिकॉन व्हॅली : ज्या आयफोनची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती, तो आयफोन SE अखेर अॅपल इव्हेंटमध्ये अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत लॉन्च झाला आहे.

आयफोन ५ एस सारखाच आयफोन SE चा लूक असून आयफोन ६एस एवढी त्याची बॅटरी क्षमता आहे. या नव्या आयफोन SE चा उच्चार ‘आयफोन एस्से’ असा केला जाईल.

या फोनसाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरु होणार असून ३१ मार्चपासून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. शिवाय, मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगातील ११० देशांमध्ये आयफोन SE उपलब्ध करुन दिला जाणार आहे. आयफोन SE सोबत आयपॅड प्रो आणि आयवॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लॉन्च करण्यात आले आहे.

टीम कूक यांनी यावेळी आयफोनच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली. यूजर्सच्या खासगी गोष्टींच्या सुरक्षिततेबाबत अॅपल कंपनी तडजोड करणार नाही. अॅपल कंपनी कायमच यूजर्सना सुरक्षिततेची हमी देते. असे टीम कूक यावेळी म्हणाले. शिवाय, जगभरातील एक अब्ज लोक आयफोन वापरतात, याचा आम्हाला गर्व असल्याचे टीम कूक म्हणाले.

अशी आहे आयफोन SE ची किंमत
६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ४९९ डॉलर (३२ हजार २०० रुपयांहून अधिक)
१६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९९ डॉलर (२६ हजार ५५५ रुपयांहून अधिक)

Leave a Comment