लावाचा बजेट स्मार्टफोन एसवन फलेअर लाँच

d1flair
लावाने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन एस वन फ्लेअर लॉच केला आहे. दिसायला एकदम मस्त असलेला फोन कंपनी साईटवर ४३४९ रूपयांना मिळणार असला तरी कांही ऑनलाईन रिटेल स्टोअर्समध्ये तो त्याहीपेक्षा कमी म्हणजे ३७९९ रूपयांतच ग्राहकांना मिळू शकतो आहे.

या फोनच्या बॅकसाईडला टेक्स्चर्ड मेटॅलिक फिनिश दिला गेला आहे. अँड्राईड ५.१ लॉलीपॉप ड्युअल सिम, ४.५ इंचाचा एफडब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले, ५१२ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ३.२ एमपीचा रियर ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. तो थ्रीजी, टूजी, वायफाय, जीपीआरएस, एज, मायक्रो यूएसबी व एफएम कनेक्टीव्हीटीला सपोर्ट करतो. ब्लँक व शँपेन गोल्ड कलर मध्ये तो उपलब्ध आहे.

Leave a Comment