स्प्रूस क्रिकमध्ये जवळजवळ प्रत्येकाकडे आहे विमान

viman
जगात राहण्यासाठी अनेक खास स्थळे आहेत. अमेरिकेतील फ्लॉरिडा च्या उत्तरपश्चिमेला असलेले स्प्रूस क्रिक हे असेच एक मस्त ठिकाण म्हणावे लागेल. अर्थात येथे राहणार्‍यांत उच्चवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे. या गावात सुमारे ५ हजार नागरिक १३०० घरे आणि ७०० हँगर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येने येथे हँगर्स असण्याचे कारण म्हणजे येथे जवळजवळ प्रत्येकाकडे स्वतःचे विमान आहे. त्यामुळे येथे कार गॅरेजपेक्षा हँगर्स अधिक आहेत.

या गावात सर्वाधिक संख्येने असणारे नागरिक प्रोफेशनल पायलट आहेत. डॉक्टर, वकील व अन्य प्रोफेशनल नागरिकही आहेत पण कमी संख्येने. येथे अनेक गोल्फ कोर्स आहेत तसेच फ्लाईंग क्लबची संख्याही मोठी आहे. येथे असलेल्या विमानात छोटी सेसना विमाने, जी ५१, मस्टँग, एल ३९, एलब्रेट्रेस, एक्लीप्स ५०० अशी छोटी विमाने आहेत. एकाकडे रशियन मिग १५ विमानही आहे. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता व पायलट जॉन ट्रेवोल्टा या ठिकाणी अनेक वर्षे राहिला होता.

या गावाचा स्वतःचा रनवेही आहे आणि दर शनिवारी रनवेवरून तीनच्या ग्रुपमध्ये फ्लाईंग करून अनेकजण एअरपोर्टवर ब्रेकफास्ट साठी जातात कारण ही या गावची परंपरा आहे. येथील नागरिक नुसती विमाने बाळगून आहेत असे नव्हे तर जगभरातल्या महागड्या कार्स आणि बाईक्सही त्याच्या ताफ्यात आहेत.

Leave a Comment