डोमिनोजने सादर केला जगातील पहिला पिझ्झा डिलिव्हरी रोबोट

dominos
जगातील पहिला पिझ्झा डिलिव्हरी रोबोट ऑस्ट्रेलियाची पिझ्झा कंपनी डोमिनोजने सादर केला असून डोमिनोज रोबोटिक यूनिट (डीआरयू) असे या या रोबोटचे नाव आहे. डामिनोजने सादर केलेला रोबोट हा वाहननुमा रोबोट निश्चित केलेल्या जागेवर पिझ्झाची डिलिव्हरी करण्यासाठी लेजझरचा वापरे करेल आणि डिलिव्हरीनंतर ग्राहकांकडून पैसेही घेऊन येईल.

डोमिनोज गटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि प्रबंध निदेशक डोन मीजने एका निवेदनात म्हटले की हा रोबोट नवीन संधीना जन्म देण्यास सुरुवात करत आहे. त्याच बरोबर ऑस्ट्रेलिया व जगभरामध्ये डोमिनोजसाठी एक नवीन मोहिम सुरु करणारा आहे.

डीआयू २० किलोमीटर प्रतितास गतीने चालू शकतो. याला फुटपाथ, पगडंडी आणि दुचाकी वाहनांच्या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी सक्षम बनविले गेले आहे.

Leave a Comment