लेनोवोचा वाईबे के ५ प्लस भारतात आला

vibek5
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवोने त्यांचा नवा वाइबे के सिरीजमधला के फाईव्ह प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून येत्या २३ मार्चपासून तो फ्लिपकार्टवर मिळू शकणार आहे. या फोनची किंमत आहे ८४९९ रूपये.

या फोनसाठी ५ इंची आयपीएस एलसीडी फुल एचडी डिस्प्ले दिला गेला असून उन्हातही हा स्क्रीन सहज दिसू शकतो. फोनला अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्ङच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फोटो ग्राफीसाठी १३ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन फोरची सपोर्ट करतो त्याचबरोबर वायफाय, एलईटी, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी अशीही कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment