आपल्याच मुलांना परंपरा वाचविण्यासाठी मारताहेत जारवा

jarwa
अंदमान : सध्या जारवा आदिवासींच्या मुलांच्या खुन्याबाबत अंदमान पोलिस अडचणीत आहेत. हे खुनी आणि कोणी नसून त्याच समुदायाचे लोक आहेत. या समुदायाच्या लोकांचे संरक्षण करावे की त्यांच्यावर कारवाई करावी ही पोलिसांसमोरची खरी अडचण आहे. अशा मुलांना जारवा समुदायाच्या परंपरेनुसार ठार केले जाते, ज्यांची आई विधवा असते किंवा वडिलांना समुदायाबाहेर काढले जाते.

जर कोणताही नवजात काळ्या रंगाचा नसेल किंवा थोडासा देखील उजळ असेल तर त्याच्या समुदायाच्या लोकांकडून त्याची हत्या होण्याची भीती असते. मागील काही महिन्यांमध्ये येथे अशा मुलांच्या हत्येची काही प्रकरणे समोर आली आहेत. अंदमान पोलिसांसमोर अडचण ही आहे की, ते तक्रारीवर कारवाई करावी की समुदायाची परंपरा कायम राखावी. जारवा समुदायाच्या काही मुलांच्या हत्येची प्रकरणे समोर आली आहे. तक्रारीनंतर देखील आरोपींवर कारवाई होत नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एका मुलाच्या हत्येनंतर आलेल्या साक्षीदाराने पोलिसांना पूर्ण माहिती दिली, परंतु जारवा समुदायाच्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई झाली नाही. या मुलाला रुग्णालयातून उचलून नेण्यात आले होते, नंतर तो वाळूत गाडलेला आढळला.

सरकारी माहितीनुसार या जमातीची लोकसंख्या जवळपास ४०० एवढी आहे. ही जमात अंदमान बेटाच्या उत्तर भागात राहते. १९९० मध्ये ही जमात पहिल्यांदा बाहेरील जगाच्या संपर्कात आली. जारवा जमातीच्या भागात विदेशी किंवा बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी आहे. मागील काही वर्षांमध्ये बाहेरील लोक येथे घुसल्याचे वृत्त आहे. यावर मोठा वाद देखील झाला होता. येथे आलेल्या पर्यटक किंवा बाहेरील लोकांनी जारवा महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले.

Leave a Comment