पवनहंसची तिकीटे रेल्वे तिकीट साईटवर होणार बुक

pavan-hans
आयआरसीटीसी व पवनहंस हेली यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य करार केला आहे. त्यानुसार पवन हंस हेलिकॉप्टर प्रवासाची तिकीटे आयआरसीटीसी या रेल्वे तिकीट वेबसाईटवरूनही बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसी व नागरी विमान कंपनी पवनहंस यांच्यामध्ये सहकार्य करार झाल्याची माहिती रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए.के. मनोचा यांनी दिली.

ते म्हणाले या मागे पवन हंस हेलि टूरिझम वाढविणे हा उद्देश आहे. या दोन्ही सरकारी कंपन्या आहेत व आयआरसीटीसी ची आउटलेट व बेवसाईट दोन्हीच्या मार्केटिंग व प्रॉडक्ट सेवा साठी वापरली जाणार आहे. या क्रॉस सेलिंगमुळे ग्राहक सेवा विस्तारास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही कंपन्या परस्पर सहकार्याने केटरिंग हॉस्पिटॅलीटी, बजट हॉटेल्स सेवाही सुरू करणार आहेत.

Leave a Comment