
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या खास पुरुषांसाठी वस्त्र आणि अंतर्वस्त्रांच्या ‘ट्रू ब्लू’ या ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी अरविंद फॅशनबरोबर भागीदारी केली आहे. या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरात २५ ते ३० वस्त्र दालने सुरू करण्यात येणार आहेत. आगामी ५ वर्षात २०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे लक्ष्य ‘ट्रू ब्लू’ने ठेवले आहे.
सचिन आणि अरविंद फॅशनची भागीदारी
‘ट्रू ब्लू’च्या माध्यमातून ग्राहकांना वस्त्र प्रावरणातील एक अनोखा अनुभव देण्याचा आपला प्रयत्न असून भारतीय संस्कृती आणि आधुनिकता याचा संगम ‘ट्रू ब्लू’मध्ये बघायला मिळेल; असे सचिनने यावेळी सांगितले.
कपड्यांच्या वितरणातील ‘अरविंद’ची हातोटी आणि सचिनची लोकप्रियता यामुळे ‘ट्रू ब्लू’ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असून सर्वप्रथम मुंबईत ‘ट्रू ब्लू’चे पहिले दालन सुरू करण्यात येणार आहे; अशी माहिती ‘अरविंद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मेहता यांनी यावेळी दिली.
