
नवी दिल्ली – भारतामध्ये विकल्या जाणा-या हर्ले-डेव्हिडसनच्या काही निवडक मॉडेलच्या किमतींमध्ये ३० हजार रुपयापर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने होणारा परिणाम टाळण्यासाठी घेण्यात आला आहे.
३० हजार रुपयांनी महाग झाली हर्ले-डेव्हिडसन
भारतामध्ये ही वाढ स्ट्रीट ७५०, स्पोर्टस्टार सीरिज आणि सॉफ्टेल मोटरसायकलवर लागू होणार आहे. नवीन किंमत एक एप्रिलपासून लागू होणार आहे. सध्या स्ट्रीट ४५० मॉडेलची किंमत ४.५२ लाख रुपयापासून सुरू होते. सॉफ्टेल मालिकेतली तीन मॉडेलची किंमत १५.१५ लाख रुपये (फॅट बॉय), १६.४ लाख रुपये (ब्रेकआऊट) आणि १६.६ लाख रुपये (हेरिटेज सॉफ्टेल क्लासिक) सुरू होते. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेल्या घसरणीमुळे किमतीमध्ये वाढ झाली आहे.
