भारताकडे आशियाई देशांचे नेतृत्त्व

imf
नवी दिल्ली – येणा-या काही वर्षामध्ये भारताच्या नेतृत्त्वाखाली अशियाई देशांची अर्थव्यवस्था मोठा विकास घडवून आणण्यासाठी तयार असून भारतामध्ये येणा-या काही वर्षामध्ये मोठी आर्थिक क्षमता निर्माण होणार असून, भारताच्या नेतृत्त्वाखाली इतर आशियाई देश आपला आर्थिक विकास दर गाठू शकतील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य क्रिस्टीन लेगार्ड यांनी म्हटले आहे.

त्या ‘प्रगत आशिया परिषदे’मध्ये बोलत होत्या. अनेक नवीन उभरत्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत निर्माण होत आहेत. त्यामध्ये भारताचा प्रामुख्याने समावेश आहे. आता माझे आयएमएफ म्हणण्यापेक्षा आपले आयएमएफ बनले आहे. आशियामध्ये आर्थिक विकास दर मोठय़ा प्रमाणात वाढत असून, भारतामधून मोठय़ा प्रमाणात विकासाला चालना मिळत आहे. भारत आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र बनत असून, इतर आशियाई देशांचे प्रमुख केंद्र तयार होत असल्याचे लेगार्ड यांनी म्हटले आहे.

मोठय़ा आणि वाढत असलेल्या लोकसंख्येसह आशिया वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणांसाठी कंबर कसली असून, भारत डिजिटल होण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करत आहे. त्यामध्ये मोठे यश येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment