होळी निमित्त नेक्सस ५X च्या किंमतीत भरघोस सूट

nexus
मुंबई – गुगल वर्षातील येणा-या सर्वात मोठ्या सणासाठी खास ऑॅफर घेऊन आले आहे. गुगलनेहोळीच्या मुहुर्तावर आपल्या शानदार आणि नुकत्याच लाँच केलेल्या एलजी नेक्सस ५X स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल ४००० रुपयांपर्यंत ही सूट दिली असून ही ऑॅफर २७ मार्चपर्यंत उपलब्ध आहे. होली है! नावाने सुरु झालेला हा सेल १४ दिवसांपर्यंत सुरु राहणार आहे. ही ऑॅफर नेक्सस ५X १६ जीबी आणि ३२ जीबीवर मॉडेलवर उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या ऑॅनलाइन शॉपिंग वेबसाईटवरही नेक्सस ५X उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या १६ जीबी व्हेरिएंटची किंमत २४,९७८ रु. आहे. तर ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत २९,९३० रु. तर दुसरीकडे अ‍ॅमेझॉनवर या फोनच्या १६ जीबी व्हेरिएंटची किंमत २३,३९९ रु. आहे. तर ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३१,७८५ रु. आहे.

Leave a Comment