‘व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’वर भारतात बंदी

Vicks
मुंबई: अमेरिकेतील ग्राहकोपयोगी औषधी उत्पादने बनविणारी आघाडीची कंपनी ‘प्रॉक्टर अँड गँबल’च्या भारतातील शाखेने बाजारपेठेत आणलेल्या ‘व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ हे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घटक असल्याचा ठपका ठेऊन या औषधावर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी घातली आहे.

‘व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ हे ‘प्रॉक्टर अँड गँबल इंडीया’ ने सर्दी, खोकला, अंगदुखी अशा सर्वसाधारण आजारांसाठी विकसित केलेले औषध आहे. या औषधात प्रामुख्याने पॅरासिटॅमॉल, फेनायलेफ्रीन, कॅफीन यांचा समावेश आहे. याशिवाय या औषधांमध्ये एकूण ३४४ रसायनांचे मिश्रण आहे. त्यामध्ये अँटीबायोटीक्स आणि अॅनॅल्जेसिक्सचा समावेश आहे. समितीने या रसायनांच्या मिश्रणाचे रोगानिवारणाच्या दृष्टीने आवश्यकतेचे तार्कीक स्पष्टीकरण कंपनी देऊ शकली नसल्याचे या औषधाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

या अहवालानुसार या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आपल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, उपयुक्तता आणि सुरक्षितता याबाबत तज्ज्ञांकडून चाचपणी केली जाते; असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बंदीच्या आदेशानुसार ‘व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’चे उत्पादन बंद करण्यात आले असून विक्रीही बंद करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment