थायलंडमधील वैशिष्ठ्यपूर्ण ड्रॅगन वट मंदिर

dragon
थायलंडची राजधानी बँकॉकपासून चाळीस किमीवर असलेले बुद्धमंदिर पर्यटन नकाशात दाखविले गेलेले नसले तरी हे एक वैशिष्ठपूर्ण आणि भव्य मंदिर आहे. याची रचना विशेष आहे व त्यामुळे त्याला ड्रॅनग वट मंदिर म्हणून ओळखले जाते. या अतिविशाल इमारतीभोवती ड्रॅगनच्या रूपात जिना केला गेला आहे आणि जणू ड्रॅगनचा विळखाच या इमारतीला पडला आहे असा भास होतो. सतरा मजली उंचीच्या या इमारतीवर ड्रॅगनची शेपूट पायथ्याशी तर डोके छतावर आहे.

या मंदिरात विशाल बुद्ध मूर्ती विराजमान आहे तसेच अनेक छोट्या बुद्धमूर्तीही आहेत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी ड्रॅगनचा जिना चढून वर जावे लागते. आता हा जुना जिना धोकादायक झाला आहे व त्यामुळे मंदिराचा कांही भाग बंद करण्यात आला आहे. स्थानिकांसाठी हे स्थान अतिशय पवित्र मानले गेले आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात.

Leave a Comment