इनफोकसने आणला स्वस्त फोर जी बिगो २०

bingo
इनफोकस या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने नुकताच त्यांचा स्वस्त फोर जी स्मार्टफोन बिगो २० नावाने लाँच केला आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने बिंगो २१ सादर केला होता. नवा बिंगो २० काळा, पांढरा व ऑरेंज रंगात उपलब्ध असून त्याची किमत आहे ५७४९ रूपये.

नव्या बिगो २० साठी ड्युअल सिम( दोन नॅनो सिम), अॅड*ाईड ५.१ वर आधारित कंपनीची स्वतःची इनलाईफ यूआय २.० ओएस दिली गेली आहे. या फोनला साडेचार इंचाचा आयपीएल डिस्प्ले दिला आहे व त्यात ऑन सेल टन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही कॅमेरे एलईडी फ्लॅशसह आहेत. या फोरजी फोनसाठी वायफाय, एलटीई, ब्ल्यू टूथ, जीपीएइ, मायक्रो यूएसबी अशी अन्य कनेक्टिव्हीटी ऑप्शन्सही आहेत.

Leave a Comment