इकोफ्रेंडली एअरबस ३२० निओ इंडिगोच्या ताफ्यात दाखल

indigo
युरोपियन एअरक्राफट उत्पादक कंपनी एअरबस चे नवे इको फ्रेंडली ए ३२० निओ हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी उतरले. ही विमाने आपल्या ताफ्यात सामील करणारी इंडिगो ही पहिली विमानकंपनी ठरली आहे. इंडिगो एअरबसचा भारतातील मोठा खरेदीदार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवी ए ३२० निओ विमाने डिसेंबरमध्येच इंडिगोच्या ताफ्यात येणार होती मात्र कांही तांत्रिक अडचणींमुळे ती आता सामील झाली आहेत.कंपनीचे अध्यक्ष आदित्य घोष म्हणाले, हवाई वाहतूक क्षेत्रात पडलेले कंपनीचे हे पुढचे पाऊल आहे. भारतात सर्वदूर विमानसेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एअरबसच्या म्हणण्याप्रमाणे नवी निओ विमाने पूर्वीच्या ए ३२० पेक्षा १५ टक्के कमी इंधन वापरणारी आहेत.

Leave a Comment