टॅब आणि आयपॅडला स्वतंत्र ‘एक्सरे’तून वगळले

tab
नवी दिल्ली: यापुढे विमान प्रवास करताना विमानतळावर आपले टॅब आणि आयपॅड हँडबॅगच्या बाहेर काढून त्याचे स्वतंत्र स्कॅनिंग करण्याच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

ज्याची बॅटरीसाठी वेगळी स्वतंत्र जागा नाही; म्हणजेच इनबिल्ट बॅटरी आहे अशा उपकरणांना त्यांना स्वतंत्र स्कॅनिंगपासून वगळण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने घेतला आहे. या निर्णयाची माहिती असलेले पत्रक विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या निमलष्करी दलांना पाठविण्यात आले आहे.

आतापर्यंत भारतात विमानतळावर टॅब आणि आयपॅडसारख्या उपकरणांना आपल्या हँडबॅगच्या बाहेर काढून त्याचे स्वतंत्र स्कॅनिंग करण्याचा नियम लागू होता. मात्र पश्चिमी देशांमध्ये इनबिल्ट बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्वतंत्र स्कॅनिंगपासून वगळण्यात आले आहे. भारताच्या नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाने त्याचेच अनुकरण केले आहे.

Leave a Comment