९ वर्षांची मुस्कान चालवते गरीब मुलांसाठी बाल पुस्तकालय

muskan
भोपाळ – झोपडपट्टीत रहाणाऱ्या मुलांसाठी तिसऱ्या इयत्तेत शिकणारी ९ वर्षांची मुस्कान अहिरवार ही मुलगी वाचनालय चालवते. मुस्कान तिच्याकडे असलेली ११९ पुस्तके शाळा सुटली की घराबाहेर मांडते. त्यातल्या गोष्टी ती मोठ्या मोठ्याने वाचते. त्यामुळे बाजुच्या झोपडपट्टीतली मुले गोळा होतात. ज्या मुलांना वाचायला शिकायचे आहे किंवा ज्यांना वाचायला आवडते त्यांनी पुस्तक घेऊन जावे असेही ती त्यांना सांगते.

राज्याच्या शिक्षण मंडळानेही तिच्या या वाचनालयाला बाल पुस्तकालय असा दर्जा दिला आहे. तिसरीतली ही मुलगी गरीबांच्या मुलांना मित्र-मैत्रिणींनो या पुस्चक वाचुया आणि जग जाणून घेऊया अशी साद घालते आणि आपल्या परीने ज्ञानयज्ञ पेटता ठेवते.

Leave a Comment