पॅनासॉनिक आणला ४,९९९ रुपयात स्मार्टफोन

panasonic
नवी दिल्ली : आपल्या स्मार्टफोन श्रेणीतील ‘टी-५०’ हा ३जी नवीन स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने लाँच केला असून ४,९९९ रूपये एवढी या फोनची किंमत आहे.

कसा आहे पॅनासॉनिकचा ‘टी-५०’ : यात ४.५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून अँड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टिम, १ जीबी रॅम, १.३ गीगाहर्टज् ऑक्टाकोरचा प्रोसेसर त्याचबरोबर ५ मेगापिक्सल रिअर, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याची इंटरनल स्टोअरेज क्षमता ८ जीबी आहे. यात ३जी, वायफाय, ब्ल्यूटय़ूथ ४ , जीपीएस अशा विविध कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता १६०० एमएएच एवढी आहे.

Leave a Comment