रोल्स रॉईसची पहिली ‘कन्सेप्ट कार’ लवकरच

rolls-royce
लंडन: ‘बीएमडब्ल्यू’च्या शताब्दीनिमित्त रोल्स रॉईस आपली पहिलीच ‘कन्सेप्ट कार’ विकसित करीत आहे. ही कार गुडवूड फेस्टिवल ऑफ स्पीडमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

या ‘कन्सेप्ट कार’चे नाव ‘रोल्स रॉईस ग्रँड सेंचुरी’ ठेवण्यात येणार आहे. ही कार ‘बीएमडब्ल्यू’च्या चार कन्सेप्ट कार्सपैकी एक असली तरीही रोल्स रॉईसची ही पहिलीच कन्सेप्ट कार असणार आहे. ‘कन्सेप्ट कार्स गुडवूड फेस्टिवल ऑफ स्पीड’ दि. २३ ते २६ जून या कालावधीत लंडन येथे होत असून त्यामध्ये ही कार प्रदर्शित केली जाणार आहे.

Leave a Comment