ट्रू-कॉलरचे नवे ‘अॅव्हेलिबिलीटी’ फीचर लाँच

truecaller
मुंबई – एक नवी अपडेट कॉलर आयडेंटिटी अॅप ट्रू-कॉलरने लाँच केली आहे. ज्यात या अॅपविषयी अनेक नवे फीचर्स आहेत. यातील एका नव्या फीचरनुसार आता तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहे की नाही हे सांगता येईल.

तुमच्या मोबाईलमधील कॅलेंडर अॅक्सेस करुन हे नवीन फीचर तुमच्याविषयीची माहिती जमा करते. यानंतर दुसऱ्या यूजरला या अॅपवर कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुमचे स्टेटस सांगितले जाते. ही चॅटसारखी विशिष्ट सोय असेल ज्यात ऑनलाईन यूजर्ससाठी हिरव्या रंगाचा ठिपका दिसेल. काही व्यक्तींसाठी मात्र ही डोकेदुखी ठरू शकते. कारण, खरच कोणी बोलण्यासाठी व्यस्त आहे की कोण खोट बोलत आहे हे इतरांना समजण्याची यात शक्यता निर्माण होऊ शकते.

Leave a Comment