आऊट ऑफ स्टॉक झाला शाओमीचा ‘रेडमी नोट ३’

xaiomi
मुंबई: काल शाओमीच्या रेडमी नोट ३ या नव्या स्मार्टफोनचा पहिला फ्लॅश सेल होता. अॅमेझॉन आणि mi.comवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होता. या दोन्ही वेबसाइटवर रेडमी नोट ३ आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. आता या फोनचा दुसरा सेल १६ मार्चला होणार आहे.

या फोनच्या पुढील सेलची माहिती शाओमीने ट्वीट करुन दिली आहे. ज्याची बुकींग काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाली आहे. मात्र, किती वेळात हे स्मार्टफोन सोल्ड आऊट झाले याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

मात्र पहिल्याच सेलमध्ये रेडमी नोट ३च्या बऱ्याच चाहत्यांची बरीच निराशा झाली. कारण की हा स्मार्टफोन काही सेकंदांमध्येच सोल्ड आऊट झाला होता. तर ट्विटर मात्र, अनेकांनी शाओमीवर जोरदार टीका केली. असेल फ्लॅश सेल म्हणजे खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचीही टीका करण्यात आली आहे.

Leave a Comment