दर आठवड्याला कर्नाटकमधील विद्यार्थी पाहतात ७ तास पॉर्न

porn
मंगळुरू – १६ ते २१ वयोगटातील कर्नाटकमधील पदवीधर न झालेली ६६ टक्के मुले आठवड्यात साधारण ७ तास पॉर्न फिल्म्स पहात असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले असून वयाच्या ९व्या वर्षापासूनच यामधील ब-याचशा मुलांना अशा फिल्म्स पाहण्याची सवय लागते तर ३० टक्के मुली आठवड्याभरात साधारण ५ तास पॉर्न पाहतात, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

ही बाब ‘ रेस्क्यू’ या एनजीओतर्फे करण्यात आलेल्या या सर्व्हेमधून उघड झाली आहे. तब्बल १८३ कॉलेजमधील ३,५००० विद्यार्थ्यांना यासाठी प्रश्न विचारण्यात आले. ‘ रेस्क्यू’ एनजीओचा सीईओ अभिषेक क्लिफोर्डने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कॉलेजमधील एका वर्गातील २० मुलांना त्यांच्या मित्रांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. तुमच्या वयाची किती टक्के मुलं आठवड्याला किती तास पॉर्न फिल्म्स पाहतात? असे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. हा सर्व्हे बिदर, गदग, मैसूर, चामराजनगर, मंड्या, धारवाड, बेळगाव आणि बंगळुरू येथील कॉलेजेसमधील मुलांना प्रश्न विचारून करण्यात आला तर हा सर्व्हे मंगळुरूमध्ये अद्याप सुरू आहे.

३० टक्के मुले हिंसक पॉर्न पाहतात ही या सर्व्हेतील धक्कादायक बाब आहे. दरवर्षी सुमारे १.७ लाख मुले बलात्काराचे व्हिडिओ पाहण्यास सुरूवात करतात आणि त्याचप्रमाणे हायर सेकंडरी, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्यांनी बलात्काराचे सुमारे ४९०० व्हिडीओ पाहिलेले असतात. यातील सर्वात अस्वस्थ करणारी माहिती म्हणजे, हे व्हिडिओ पाहून आपल्याला प्रत्यक्षात कोणावर तरी बलात्कार करण्याची इच्छा होत असल्याचे ७६ टक्के मुलांनी नमूद केले. यापैकी १० टक्के मुलांनी जरी आपली इच्छा पूर्ण करण्याचे ठरवल्यास कर्नाटकमध्ये दरवर्षी १३ हजार बलात्कारी बनू शकतात, समोर येऊ शकतात’ अशी भीती अभिषेकने व्यक्त केली. त्यामुळे किशोरवयात पॉर्न फिल्म्स पाहण्यामुळे येणा-या संकटाची, धोक्याची या मुलांना कल्पना दिली गेली पाहिजे, असे मत अभिषेकने व्यक्त केले.

Leave a Comment