‘लावा’चा इरिस फ्यूअल एफ२ बाजारात दाखल

lava
नवी दिल्ली : इरिस फ्यूअल श्रेणीतील‘इरिस फ्यूअल एफ२’ हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘लावा’ने सादर केला आहे. ब्लॅक आणि व्हाईट रंगात उपलब्ध केलेल्या या फोनची किंमत ४४४४ रूपये आहे. हा फोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘इबे’वर खरेदी करता येईल.

कसा आहे इरिस फ्यूअल एफ२ – याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून यात अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टिम आणि १.३ गीगाहर्ट्ज क्वॉडकोरचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५१२ एमबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल, ३२ जीबी एक्सपांडेबल स्टोअरेज क्षमता देण्यात आली आहे. यात एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सलचा रिअर आणि ०.३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३००० एमएएच लिथियम पॉलिमर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ, जीपीएस, मायक्रोयूएसबी अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment