पाच हजार रुपयांनी स्वस्त झाला गूगलचा नेक्सस ६पी

nexus
मुंबई : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या तीन दिवसांचा बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला असून या सेलमध्ये स्मार्टफोन तसंच इतर गॅझेट्सवर सूट दिली जात आहे. याशिवाय एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यास १० टक्के एक्स्ट्रा सूट देण्यात येत आहे. याची जास्तीत जास्त सूट १७५० रुपये आहे. हा सेल ७ ते ९ मार्चपर्यंत आहे.

गूगलच्या ३२ जीबी व्हेरिएंटच्या नेक्सस ६पी वर या सेलमध्ये फ्लॅट ५००० रुपयांची सूट देण्यात येत आहेत. एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला हा फोन २०,००० रुपयांना मिळू शकतो. या फोनची इंटरनल मेमरी २ जीबी असून रॅम ३ जीबी आहे. याशिवाय मोटो एक्स प्लेवर पाच टक्के सूट दिली जात आहे.

सेलमध्ये मेमरी कार्ड, स्मार्ट वॉच, लॅपटॉप, कॅमेरा, हेडफोन आणि टीव्हीवरही डिस्काऊंट मिळत आहे. लॅपटॉपवर 10,000 रुपयांपर्यंत सूट आहे.