उद्या काही भागात दिसणार सूर्यग्रहण

grahan
नवी दिल्ली – उद्या खग्रास सूर्यग्रहण दिसणार असून ते काही देशांमध्ये खग्रास दिसणार असले तरी भारतात ते खंडग्रास स्वरूपातच दिसणार आहे. तसेच त्याचे वेध सूर्योदयापूर्वीच लागणार असल्याने त्याच्या प्रारंभीची आणि मध्यस्थिती पाहता येणार नाही. बुधवारचा सूर्योदय हा ग्रहण स्थितीतच उगवणार असल्यामुळे त्याचा केवळ शेवट (मोक्ष) भारतात पाहता येणार आहे. या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक ठिकाणी निरीक्षण स्थाने तयार करण्यात आली आहेत. चेन्नई आणि बेंगळूर येथे विदेशातूनही विज्ञानप्रेमी ग्रहणाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

हे ग्रहण बेळगाव व सांगली येथे सूर्योदयाच्या वेळी काही काळ पाहता येणार आहे. तसेच पश्चिम सागरतटाचा भाग वगळाता पूर्ण कर्नाटकात ते दिसणार आहे. महाराष्ट्रातही विदर्भ व मराठवाडय़ाच्या काही जिल्हय़ांमध्ये ते दिसणार असून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, कऱहाड, सातारा, गोवा, मुंबई , पुणे, नाशिक इत्यादी पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणी ते दिसणार नाही.