गुरुवारी होणार सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण

isro
चेन्नई – गुरुवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. देशांतर्गत दिशादर्शक प्रणाली सुरू करण्याच्या योजनेतील हा सहावा उपग्रह असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. आयआरएनएसएस-1एफ नावाच्या उपग्रहाला पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने अंतराळात सोडण्यात येणार आहे. या उपग्रहाचे वजन १४२५ किलोग्रॅम असून आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून दुपारी चार वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे. २०१६मध्ये भारताकडून करण्यात येणारे हे दुसरे प्रक्षेपण आहे. यापूर्वी २० जानेवारी रोजी आयआरएनएसएस-१ ई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.

Leave a Comment