झपाटलेल्या कारागिराने बनविले अनोखे वाद्य

marbles
स्टॉकहोम: स्वीडनच्या झपाटलेल्या युवकाने लाकूड, धातूच्या पट्ट्या आणि दोन हजार गोट्या वापरून एक भन्नाट वाद्य बनविले आहे. मार्टीन मोलिन असे या युवकाचे नाव आहे. लाकडाच्या सांगाड्यात बसविलेल्या गिअर्सच्या फिरण्याने गोट्या घरंगळत येऊन धातूच्या पट्ट्यावर पडतात आणि त्यापासून संगीताची निर्मिती होते. या अनोख्या यंत्रावर किकड्रम, स्नेअरड्रम, सिझाल सिंबल, व्हायब्राफोन, बास अशा अनेक वाद्यांचा ध्वनी निर्माण होतो.

Leave a Comment