६१.५० रुपयांनी स्वस्त विनाअनुदानित गॅस सिलिंडर

lpg
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार असून पण हा विनाअनुदानित सिलिंडर असून ६१.५० रुपयांनी तो स्वस्त होणार आहे. दिल्लीत एक मार्चपासून तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने विनाअनुदानित १४.२ किलोग्रॅमचा घरगुती गॅस सिलिंडर ५७५ रुपयांऐवजी आता ५१३.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात ११८ रुपयांची घट करण्यात आली होती. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ९ पैशांनी घट करण्यात आली होती. तसेच याआधी पेट्रोल किंमतीत ३.०२ रुपयांनी घट करण्यात आली. तर डिझेलमध्ये १.४७ रुपयांनी वाढ करण्यात आली. या महिन्यातील डिझेलची दुसरी दरवाढ आहे.

Leave a Comment