
मुंबई : सध्या ग्राहक खेचण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये जणू काही स्पर्धाच लागलेली दिसून येते. काही कंपन्या कमी किमतीत स्मार्ट फोन देत आहे. तर काही मोबाईल कंपन्या कॉल दरात सूट देत आहेत. आता तर आयडिया कंपनीने १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा करुन धमाका उडवून दिला आहे.
आयडिया १ रुपयात देणार १ जीबी ३जी इंटरनेट
केवळ एक रुपयात १ जीबी ३जी इंटरनेट डाटा आयडिया कंपनी देणार आहे. आयडिया मोबाईल अॅपच्या मदतीने ही शानदार ऑफर मिळवू शकता. अॅंड्राईड, आयओएस आणि विंडोज फोनवर आयडिया मोबाईल अॅपची ही ऑफर असणार आहे. पण ही ऑफर केवळ आयडिया नेटवर्कचा वापर करत आहेत, तेच याचा लाभ उठवू शकतात. याचा लाभ घेण्यासाठी आयडिया अॅप डाऊनलोड करुन घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आयडिया मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावयाला लागणार आहे. त्यानंतर एक रुपयांचा रिचार्जचे ऑप्शन दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये १ जीबीपर्यंत ३ जी डाटा केवळ एक रुपयांत मिळू शकेल.
