गूगलच्या चालकविरहीत गाडीला अपघात

google
कॅलिफोर्निया: गूगलने बनविलेल्या चालकविरहीत गाडीची अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या महापालिकेच्या एका बसशी टक्कर झाली आहे. ज्यावेळी हि टक्कर झाली त्यावेळी बस ताशी २४ किलोमीटर वेगाने धावत होती, तर गुगलची हि कार ताशी ३ किलोमीटरच्या वेगाने धावत होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हि अशी पहिलीच वेळ आहे की गुगलच्या चालकविरहीत गाडीने दुसऱ्या वाहनाला ठोकर मारली आहे. विनाचालक हि लेक्सस कार रेतीने भरलेल्या पोत्यांच्या बाजूने जात होती, त्यावेळी या गाडी बाजूने जाणाऱ्या बसला टक्कर दिली. त्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने सांगितले की, बस थोडा वेग कमी करेल आणि गुगलच्या या गाडीला जाण्यास मार्ग मोकळा करून देईल, पण त्याने कारच्या सेल्फ ड्रायविंग कॉम्प्युटरला आपल्या कंट्रोलमध्ये घेतले नाही आणि बस तिच्या निर्धारित वेगाने धावत राहिल्यामुळे हि टक्कर झाली. हि घटना माउंट व्ह्यूमधील गूगलच्या हेड ऑफिसच्या जवळ घडली.

Leave a Comment