आयपॅड प्रोमध्ये असणार स्मार्ट कीबोर्ड आणि पेन्सिल सपोर्ट

ipad
मुंबई – मोबाईल उत्पादनातील अग्रगण्य अॅपल कंपनी लवकरच दोन नवे आयपॅड लाँच करणार असून यामध्ये एक मॉडेलमध्ये ९.७ इंचाची आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये १२.९ इंचाची स्‍क्रीन असणार आहे. याच महिन्यात लाँच होणाऱ्या या आयपॅडचे नाव आयपॅड प्रो असे आहे.

मागील वर्षीच अॅपलने १२ इंचाचा डिस्प्लेवाला मॅकबुक प्रो बाजारात आणले होते. आयपॅड प्रो ९.७ इंच आणि १२.९ इंचाच्या वेरिएंट स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्समध्ये थोडा बदलाव केला गेला आहे. ९.७ इंच डिस्प्लेवाल्या आयपॅड प्रोमध्ये स्मार्ट कनेक्टर आणि स्मार्ट कीबोर्ड कव्हर असणार आहे. तसेच १२.९ इंच डिस्प्लेवाल्या वेरिएंटमध्ये अॅपल पेन्सिल (स्टायलस) टेक्नोलॉजीबरोबरच ए९ प्रोसेसर आणि पहिल्यापेक्षा अधिक रॅम देण्यात येणार आहेत.

१२.९ इंचाच्या मॉडेलमध्ये क्वाड स्टिरिओ स्पीकर्स असणार आहेत, त्याचबरोबर ९.७ इंचाच्या मॉडेलमध्ये काही रंगांचे ऑप्शन आणि अधिक स्टोरेज क्षमतादेखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर असा अंदाज वर्तविला जात आहे की अॅपल आयफोन ५एसई, आयपॅड प्रोबरोबरच १५ मार्चला नवीन अॅपल वॉचदेखील करू शकते.

Leave a Comment