भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी

mukesh-ambani
बीजिंग – भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मिळविला असून त्यांच्या संपत्तीमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण १.७८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा २१ वा क्रमांक लागतो. बिल गेट्स अजूनही सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी कायम आहेत.

भारतातील अतिश्रीमंतांची संख्या १११ वर पोचली आहे. अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीन आणि अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स ८० अब्ज अमेरिकी डॉलरसह पहिल्या स्थानावर आहे. १०० अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असणारे बिल गेट्स जगातील पहिली व्यक्ती आहे. त्यांनी त्यातील २० अब्ज डॉलरची संपत्ती दान केली आहे, असे हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०१६ या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment