
तैवान : तैवानमधील तायपेई येथे एका आगळ्यावेगळ्या घराची निर्मिती करण्यात आली आहे. तीन मजल्यांच्या या घरात सर्वच्या सर्व गोष्टी उलट्या लटकवण्यात आल्या आहेत. जसे की जेवणाचे टेबल-खुर्ची, पलंग, सोफा, टॉयलेट, बाथरुम या सर्व गोष्टी उलट्या लावण्यात आल्या आहेत. या घराच्या आत प्रवेश केल्यावर आपण उलटे चालतो की घर उलटे आहे, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकतो अशा पद्धतीने हे घर तयार करण्यात आले आहे.
तैवानमध्ये उभारले आहे उलटे घर
या घराची निर्मिती तैवानच्या पर्यटन विभागाने केली आहे. या घरात चक्क एक गाडीही उलटी लावण्यात आली आहे. हे घर तयार करण्यासाठी साधारण दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे घर तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सध्या येथे येणारे पर्यटक या घरात जास्तीत जास्त फोटो घेण्याचा आनंद लुटत आहेत.
