एव्हरेस्ट चढण्याचा तिस-यांदा प्रयत्न करणार ऑस्ट्रेलियाची अजर

everest
नवी दिल्ली – जगातील सर्वांत उंच पर्वत माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा तिस-यांदा प्रयत्न ऑस्ट्रेलियाची तरुणी अलाइस अजर करणार आहे. जर ती यात यशस्वी झाली तर ती हा पर्वत चढणारी ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीसलँडची रहिवाशी अलाइसा अजर पुढील महिन्यात नेपाळला रवाना होणार आहे. माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी दोन महिन्या दिर्घ मोहिमेला ती एप्रिलमध्ये सुरुवात करेल. अजर २०१४ मध्ये हिमवादळामध्ये हा पर्वत चढण्यात अपयशी ठरली. तर २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाच्या कारणामुळे तिच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण झाले होते.

वयाच्या १४ व्या वर्षी अजराने माउंट किलिमंजाडोवर चढाई केली होती तर हिमालयातील अमा दबलम पर्वतावर चढाई करणारी ऑस्ट्रेलियाची सर्वांत लहान वयाची गिर्यारोहक ठरली.अजराने म्हटले की लोक तिच्या लहान वयाच्या कारणामुळे माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या तिच्या प्रयत्नाला महत्व देत राहिले नाहीत. तिने म्हटले की माउंट एव्हरेस्ट काय होईल हे कोणाला माहिती आहे ? परंतु या कारणामुळे मी माझे प्रयत्न सोडून देणार नाही आहे. मी यासाठी शंभर टक्के कटिबध्द आहे.

Leave a Comment