अनुवंशिकताही अ‍ॅलर्जीच्या आजाराला कारणीभूत ?

allergy
वॉशिंग्टन : अनुवांशिकतेमुळेही अतिशय क्वचितपणे आढळणा-या अ‍ॅलर्जी या आजाराची लागण होत असून तशा स्वरूपाची लक्षणे भारतीय वंशातील किमान एका तरी व्यक्तीत आढळून येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. धावणे, टाळ्या वाजविणे, वाळलेला टॉवेल किंवा अतिशय खराब रस्त्यावरून बसमधून केलेला प्रवासही त्वचेवर तात्पुरत्या स्वरूपाच्या सुरकुत्यांसोबतच पित्ताच्या गाठी तयार होण्यासाठीदेखील कारणीभूत ठरतो. ज्यांना आरोग्याच्या परिभाषेत व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया(अंगावर पसरणारे लाल रंगाचे पित्ताचे व्रण)असेही म्हटले जाते. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्था (एनआयएच) च्या संशोधकांना अभ्यासाअंती हेच आढळून आले की, अशा स्वरूपाचा विस्कळीतपणा हाच सामान्य पेशीमध्ये कंप घडविण्यासाठी कारणीभूत ठरतो.

त्वचेवर लाल रंगाचे वळ हे कंप पावल्यामुळे होणा-या व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया या आजारांमध्ये आढळतात. त्यामुळे रुग्णांमध्ये नि:स्तब्ध होणे, डोके दुखणे, थकवा येणे, धुरकट दिसणे आणि तोंडाची चव आम्लयुक्त होणे यांसारखी लक्षणे वारंवार आढळून येतात. या लक्षणांचा प्रभाव हा काही तासांपुरताच असतो. मात्र प्रत्येक दिवशी त्याचा परिणाम हा ठराविक काळाने आणि सातत्याने होत असतो.

या संशोधनात तीन वेगवेगळ्या कुटुंबांचा अभ्यास केला गेला. ज्यांच्या पिढ्यांमध्ये व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत अशांचा अभ्यास केला गेला. संशोधकांनी आरोग्य नियमावलीनुसार केलेल्या संशोधनातून पहिल्या कुटुंबातील कोणत्या स्वरूपाची कारणे ही अर्टिकॅरिया या आजाराला कारणीभूत ठरतात यावर संशोधन केले. या वेळी मस्तकातील काही पेशी, ज्या त्वचा व रक्त पेशींशी निगडित द्रव आणि अन्य दाहक रसायनेही रक्तप्रवाह व त्या सभोवताली असलेल्या पेशींना पुरवीत असतात. ज्याला डिग्रेन्युलेशन (विकनिकायण चाचणी) असेही संबोधण्यात येते. हे संशोधन न्यू इग्लंड जनरल ऑफ मेडिसीनमधून प्रकाशित झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment