खजुराहो मंदिरांचे ड्रोनने फोटो घेणारा पर्यटक अटकेत

khajuraho
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कर्मचार्यांोनी जगप्रसिद्ध खजुराहो मंदिरांचे ड्रोन कॅमेर्‍याच्या सहाय्याने फोटो काढणार्‍या एका अमेरिकन पर्यटकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचे समजते. छत्तरपूरचे पोलिस अधीक्षक ललित शाक्यवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २६ वर्षीय डेरेक बासीमीर हा अमेरिकन पर्यटक या मंदिरापासून जवळ असलेल्या एका खासगी हॉटेलमध्ये उतरला होता व पश्चिम मंदिर समूह व चौसष्ठ योगिनी मंदिराचे फोटो ड्रोनच्या सहाय्याने काढत होता. तो या मंदिरांचे व्हिडीओ चित्रणही करत होता. एकवेळ त्याला त्यासंदर्भात सूचना देऊनही दुसरे दिवशी त्याने पुन्हा फोटो काढल्यानंतर त्याला पुरातत्व वास्तू व अवशेष कायदा १९५८ नुसार ताब्यात घेण्यात आले.

दहशतवादी संघटनांच्या पुरातत्त्व वास्तूंवर हल्ले करण्याच्या योजना उघडकीस आल्यापासून येथे कर्मचार्‍यांना विशेष सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

Leave a Comment