२५१च्या प्रत्येक मोबाईलमागे कंपनीला ३१ रुपयांचा नफा

freedom
मुंबई: फक्त २५१ रुपयांमध्ये मिळणाऱ्या ‘रिंगिंग बेल’च्या ‘फ्रीडम २५१’ या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु असून पण कंपनीला या प्रत्येक फोनच्या विक्रीमागे ३१ रुपयांचा नफा होणार आहे. हा स्मार्ट फोन बनवणारी कंपनी ‘रिंगिंग बेल’चे एमडी मोहित गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

२५१ रुपयांच्या स्मार्ट फोनच्या घोषणेनंतर या फोनवर आणि कंपनीवर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. कंपनीच्या नोयडामधल्या ऑफिसमध्ये जाऊन पोलीस आणि आयकर विभागाने चौकशी केली. पण मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला ‘भगोडा’ का म्हटले जात आहे, मी कायदेशीररित्या व्यवसाय करत आहे, असे गोयल म्हणाले आहेत. तसेच आम्ही सांगितलेल्या किमतीलाच हा फोन विकणार आहोत, असेही गोयल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Leave a Comment