सॅमसंगचा हायटेक फीचर्सवाला गॅलक्सी एस७, एस७ एज लाँच

samsung
बार्सिलोना : गॅलक्सी सीरीजमधले एस७ आणि एस७ एज हे महत्त्वाकांक्षी स्मार्टफोन सॅमसंगने लाँच केले आहेत. या स्मार्टफोनचे बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या प्री-इव्हेंटमध्ये लाँचिंग करण्यात आले.

सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये हायटेक फीचर्स असून ११ मार्च २०१६पासून सॅमसंग गॅलक्सी एस७ आणि एस७ एज हे फोन यूझर्सना उपलब्ध होतील. दोन्ही फोनच्या किमती अद्याप सॅमसंगने जाहीर केलेल्या नाहीत.

कसा आहे सॅमसंग गॅलक्सी एस७ – यात ५.१ इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन देण्यात आला असून यावर ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार आहे. त्याचबरोबर क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. यात १.६GHz Exynos ८८९० ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ४जीबी रॅम, त्याचबरोबर १२ मेगापिक्सेलचा रिअर, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. यात ३२जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

कसा आहे सॅमसंग गॅलक्सी एस७ एज – यात ५.५ इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन देण्यात आला असून यावर ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार आहे. त्याचबरोबर क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. यात १.६GHz Exynos ८८९० ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ४जीबी रॅम, त्याचबरोबर १२ मेगापिक्सेलचा रिअर, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. यात ३२जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

कंपनीकडून अद्याप भारतातील लाँचिंगबाबत कोणतीही घोषणा नाही. प्री-बुकिंग कधी आणि कुठे सुरु होणार याबाबतही अद्याप माहिती नाही, मात्र प्री-बुकिंगवर वीआर हेडसेट आणि ६ गेम्स देणार असल्याचे सांगितले आहे. या लाँचिंग इव्हेंटला फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गही उपस्थित होता.

Leave a Comment