विमान कंपन्या आणि टाटांमध्ये खडाजंगी

Ratan-Tata
नवी दिल्ली: नव्या विमान कंपन्यांना विदेशी विमान सेवा देण्यापासून रोखण्यासाठी जुन्या खाजगी विमान कंपन्या गटबाजी करून ‘एकाधिकारशाही’चा अवलंब करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ उद्योगपती रात टाटा यांनी केला आहे. मात्र टाटांच्या विमान कंपन्यांनी आधी देशांतर्गत सेवा द्यावी; असे सांगत स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

विमानसेवेशी संबंधित नियम ५:२० नुसार नवीन विमान कंपनीला ५ वर्ष देशांतर्गत विमानसेवा दिल्यानंतर आणि किमान २० विमानांचा ताफा असला तरच विदेश विमान सेवा देण्याचा परवाना देण्यात येतो. टाटा उद्योगाशी संबंधित दोन्ही विमान कंपन्यांना विदेशी उड्डाणाची परवानगी नाही. मात्र रतन टाटा यांनी या नियमाला आव्हान देतानाच जुन्या कंपन्यांवर गटबाजीचा आरोप केला आहे.

मात्र टाटा समूह, मलेशियाची एअर एशिया आणि अरुण भाटीया यांची टेलीस्ट्रा यांनी सुरू केलेली एअर एशिया इंडिया आणि टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सचा संयुक्त सहभाग असलेली विस्तार दोन्ही कंपन्यांचे नियंत्रण विदेशी कंपन्यांच्या ताब्यात आहे. शिवाय या कंपन्यांनी सुरुवातीला नियम ५:२० चे पालन करण्यास लेखी संमती दिली आहे. त्यामुळे आता त्यांचा या नियमाला विरोध हा दांभिकपणा आहे; असा आरोप सिंह यांनी टाटांना प्रत्युत्तर देताना केला आहे.

केंद्र सरकार सध्या विमान उड्डयन धोरण निश्चित करीत असून त्यामध्ये नियम ५:२० रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र स्पाइसजेट, जेट एअरवेज, इंडिगो व गो एअर या जुन्या कंपन्यांचा हा नियम रद्द करण्यास विरोध आहे. आम्ही अभिमानाने देशाची सेवा केली आहे. आता टाटाशी संबंधित विदेशी विमान कंपन्यांनी देशाची सेवा केली; तर काय बिघडते; असा सवाल सिंह यांनी केला आहे.

Leave a Comment