२ दिवसात स्वस्त मोबाइलसाठी ५ कोटींची नोंदणी

freedom
नवी दिल्ली: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणाऱ्या फ्रीडम मोबाईलसाठी दोन दिवसात ५ कोटीहून जास्त नोंदणी झाल्याचा दावा रिंगिंग बेल कंपनीणे केला आहे.

कंपनी सध्या या मोबाईलची ऑनलाईन नोंदणी करून घेत असून मोबाईलची अद्याप विक्री सुरू नाही. काल पहिल्याच दिवशी प्रत्येक सेंकदाला सहा लाख हिट्स मिळत असल्याने त्याचा प्रचंड ताण सर्व्हरवर आल्यामुळे साइट क्रॅश झाली होती. मात्र, आता या वेबसाईटचे अपग्रेडशन करण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

साइट क्रॅश झाल्यानंतर कंपनीने २४ तास साइट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काल दुपारी २ वाजेपर्यंत मोबाईलसाठी ५ कोटीहून अधिक नोंदणी झाल्या. नोंदणी केलेल्या ग्राहकांना एप्रिलमध्ये मोबाइल मिळणार आहे.

1 thought on “२ दिवसात स्वस्त मोबाइलसाठी ५ कोटींची नोंदणी”

Leave a Comment