महाराष्ट्रात ६,००० कोटीची गुंतवणूक करणार व्होडाफोन

vodafone
मुंबई – महाराष्ट्रामध्ये ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जागतिक दूरसंचार कंपनी व्होडाफोनने करत असल्याचे जाहीर केले असून भारतामध्ये दीर्घ कालावधीसाठी कंपनी गुंतवणूक करण्यासाठी तयार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

भारतात मोठय़ा प्रमाणावर व्होडाफोनकडून सतत गुंतवणूक करण्यात येत असल्यामुळे भारत सरकार आणि त्यांचे संबंध सकारात्मक आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची क्षमता विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आम्ही आणखी ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत, असे व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद यांनी म्हटले आहे. कंपनी डिजिटल भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या योजनांवर उत्साहित आहे. त्यामुळे आणखी गुंतवणूक करण्याची त्यांची तयारी आहे.

Leave a Comment